Saturday, November 23, 2024 03:28:42 PM
माहिममध्येअमित ठाकरेंचा पराभव झाला आहे.
Apeksha Bhandare
2024-11-23 14:40:56
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाने विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केली. शिवसेनेने आतापर्यंत दोन जागेवर विजय मिळवला आहे. या व्यतिरिक्त शिवसेना 54 जागांवर आघाडीवर आहे.
ROHAN JUVEKAR
2024-11-23 14:06:58
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार विजयी झाले.
2024-11-23 13:17:25
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 55 जागांपैकी 36 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
2024-11-23 13:06:38
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून अदिती तटकरे विजयी झाल्या आहेत.
2024-11-23 11:40:35
महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने राज्यातली आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
2024-11-23 11:29:44
अजित पवार 27 हजारांहून अधिक मतांनी मतांनी आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
2024-11-23 10:54:42
नाशिकमधील येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ आघाडीवर आहेत.
2024-11-23 10:38:02
राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.
2024-11-23 10:15:42
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.
2024-11-23 09:57:15
बारामतीत टपालातून आलेल्या मतांची मोजणी सुरू झाल्यापासून युगेंद्र पवार आघाडीवर आणि अजित पवार पिछाडीवर आहेत.
2024-11-23 08:36:35
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे.
2024-11-23 06:38:10
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02 टक्के मतदान झाले आहे.
2024-11-20 22:55:22
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले.
2024-11-20 19:49:36
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे.
2024-11-20 19:32:07
प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
2024-11-20 19:07:35
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले
2024-11-20 17:49:00
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.
2024-11-20 16:27:22
बीड जिल्ह्यातील परळीतल्या एका मतदान केंद्राबाहेर राडा झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला मारहाण केली.
2024-11-20 16:08:54
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.
2024-11-20 15:52:15
दिन
घन्टा
मिनेट